आमच्याबद्दल अधिक माहिती

इन्डिपेन्डन्ट कन्टेन्ट सर्विसेस (आयसीएस) ची स्थापना २००२ साली करण्यात आली. बुद्धिमान, कुशल कर्मचारी, स्वतंत्र काम करणारे वार्ताहर यांच्या संयुक्तपणे काम करणाऱ्या टीम्स, तसेच वेगवेगळ्या प्रकारचे योगदान देणारे तज्ञ या कंपनीसाठी काम करतात. विशिष्ट विषयाला अनुसरून मजकूर निर्मिती करणे, प्रकाशन, विपणन व संलग्न सेवा पुरवणारी ही आघाडीची कंपनी आहे.

व्यावसायिक संबंधांना आम्ही अतिशय महत्वपूर्ण मानतो, आमच्या कर्मचाऱ्यांचे कल्याण व कामातून त्यांना मिळणारे समाधान या गोष्टीदेखील आमच्यासाठी तितक्याच महत्वाच्या आहेत. म्हणूनच आमच्या कंपनीत कामाचे वातावरण अनौपचारिक स्वरूपाचे, ताणताणाव येऊ न देणारे, आनंददायी असावे हा आमचा प्रयत्न असतो.

आमच्या सेवांचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकाचे आमच्याकडे नेहमीच स्वागत आहे.