प्रसारण

जर तुम्हाला एखादी ऑनलाईन टीव्ही वाहिनी किंवा अंतर्गत रेडियो किंवा एखाद्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करून हवे असल्यास आम्ही मदत करू शकतो.
आमच्या कंपनीत प्रसारण पत्रकार व निर्मिती कर्मचारी मोठ्या संख्येने काम करत असल्याने, प्रसारण कितीही मोठे अथवा लहान असले तरी ते प्रभावी पद्धतीने मांडण्याचे काम आम्ही यशस्वीपणे करू शकतो.

आम्ही एखादे तीन मिनिटांचे, लहानसे रेडियो किंवा टीव्ही बुलेटीन तयार करू शकतो, किंवा वेगवेगळ्या खेळांचे संपूर्ण समालोचन तयार करू शकतो, त्याचप्रमाणे आमचे तज्ञ व विश्वसनीय भागीदारांच्या मदतीने प्रकाशव्यवस्था, बाह्य प्रसारण (आऊटसाईड ब्रॉडकास्ट) युनिट्स, व्यासपीठावरील व्यवस्था इत्यादीचा समावेश असलेल्या मोठ्या प्रसारणाचे कामही आम्ही करू शकतो.