समालोचन

आयसीएस ही कंपनी समालोचन, भाष्य व प्रसारण, खासकरून खेळांच्या समालोचनातील तज्ञ आहे. ऑफ-ट्यूब स्टुडियो समालोचन म्हणून आम्ही या सेवा स्वतंत्ररीत्या प्रदान करतो, ज्यामध्ये आमचे प्रसारक टीव्हीवरील कार्यक्रमांचा वापर माहितीस्त्रोत म्हणून करून श्राव्य स्वरूपात समालोचन, भाष्य तयार करतात. अधिकृत माहिती प्रसारित करण्यासाठी व तिचा व्यावसायिक वापर करण्यासाठी आम्ही अधिकारधारकांसोबतही काम करू शकतो.

बुकमेकर्ससाठी/बुकींसाठी बेटींग अनुभवात सुधारणा घडवून आणण्यासाठी व खेळातील पुढील बाजीला प्रोत्साहन देण्यासाठी खेळांचे समालोचन महत्वाचे असते, लोकप्रिय दूरध्वनी सेवा व रेडियो अॅप्ससाठीदेखील या सेवा पुरवल्या जातात.

आम्ही क्रीडा सामन्यांचे स्वतंत्र समालोचन तयार करतो, यामध्ये इंग्लिश प्रिमियर लीग, चॅम्पियन्स लीग व इतर युरोपियन फुटबॉल लीग्सचे सामने तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील इतर मोठमोठ्या सॉसर सामन्यांचा यामध्ये समावेश आहे. युके हॉर्स रेसिंगच्या समालोचनाचे आम्ही अधिकृत वितरक आहोत, जीबीआयसोबतच्या आमच्या भागीदारीमार्फत आम्ही ग्राहकांना आवश्यक असलेल्या कोणत्याही भाषेत हे समालोचन पुरवू शकतोआणि आम्ही रग्बी विश्व कप व ऍशेस क्रिकेट यासारख्या प्रसिद्ध क्रीडा स्पर्धांसाठी देखील समालोचनाचे काम केले आहे.

घडामोडींचे मिनिट दर मिनिट समालोचनदेखील (मजकूर स्वरुपात) आम्ही पुरवतो, जे त्याच्या प्रवाही व प्रेक्षकांना, श्रोत्यांना गुंतवून ठेवण्याच्या पद्धतीमुळे माहितीपर व मनोरंजकदेखील असते. प्रत्येक खेळातील प्रमुख घटना, जसे, गोल, रेड कार्ड्स, यलो कार्ड्स, सब्स्टीट्युशन्स अशा सर्वांचा समावेश करत सरासरी प्रत्येक खेळासाठी ६० पर्यंत घडामोडींचा या समालोचनात समावेश होतो. प्रत्येक खेळातील प्रमुख बाबी, खेळातील डावपेच, विशिष्ट पद्धती, नुकत्याच पार पडलेल्या खेळांमधील खेळाडूंची कामगिरी, चांगला खेळ, वाईट खेळ, महत्वपूर्ण निर्णय अशा सर्व गोष्टींचा त्यात अंतर्भाव असतो.

त्याचप्रमाणे आमचा रेडिओ कार्यक्रम फुटबॉल लाईव ‘Football Live’ मध्ये तुम्हाला दर शनिवार व रविवार दुपारी सर्व प्रमुख युरोपियन लीग्सच्या खेळातील प्रत्येक संघाचे गुण, सामन्यांचा आढावा, पुर्वावलोकने व सविस्तर आढावा हे सर्व ऐकायला मिळते.