व्हिडीओ

आमच्या ग्राहकांना त्यांची उत्पादने व सेवा इच्छित ग्राहक व प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचवण्यास मदत करतील असे प्रभावी, परिपूर्ण, मुल्य पुरेपूर वसूल करून देणारे, प्रसिद्धीमाध्यमांमार्फत भरपूर ग्राहकांपर्यंत पोहोचता येईल असे व्हिडीओज तयार करण्यात आयसीएसचा हातखंडा आहे.

व्हिडीओ हे संवादाचे व संदेश पोहोचवण्याचे प्रभावी माध्यम आहे. सोशल मिडियावर व्हिडीओ शेयर करणे अतिशय सोपे आहे. कंटेन्ट पेजेसवर व्हिडीओ एम्बेडेड असल्यास त्या पेजचा प्रभाव व संदेश पोहोचवण्याची क्षमता वाढते, एखादे युट्यूब चॅनेल तयार करत असताना संबंधित कंटेन्टची प्लेलिस्ट असल्यास ग्राहकांना बऱ्याच स्तरांवर त्याचा फायदा होतो.

कुशल न्यूजकास्टर्स व प्रेझेंटर्स असलेले कितीतरी खास पत्रकार आमच्या कंपनीत काम करतात, तुमच्या आवश्यकतेनुसार कोणत्याही विषयावर किंवा सध्या सुरु असलेल्या किंवा भविष्यात होणार असलेल्या एखाद्या कार्यक्रमाचे प्रभावी कव्हरेज ते तुम्हाला करून देऊ शकतात.

उदाहरणार्थ, फुटबॉलचा सामना, घोड्यांच्या शर्यती किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमांवर आमचे प्रतिनिधी ग्राहकांच्या इच्छेनुसार मनोरंजक व्हिडीओ पुर्वावलोकने व विश्लेषण तयार करून देऊ शकतात. प्रसिद्धी व जागरूकता वाढवण्याच्या दृष्टीने आमचे कुशल ब्रॉडकास्टर्स त्यांचे संवाद एखाद्या बुकमेकरच्या ऑड्स व प्रमोशन्ससोबत लिंक करू शकतात.

काम छोटे असो वा मोठे, विषय कोणताही असो आयसीएसकडून अनोखे मार्केटिंग व्हिडीओज तयार करून मिळू शकतात. क्रीडा विश्लेषक व्हिडीओजच्या बरोबरीनेच एखाद्या गोष्टीबद्दलचे मार्गदर्शन करणारे हाऊ टू गाईड्स तसेच सेलिब्रेटीज, मनोरंजन विश्व व राजकारण यासारख्या विषयांवर व्हिडीओज तयार करण्याचा अनुभवदेखील आमच्या गाठीशी आहे.