अनुवाद सेवा

कंपन्या तसेच व्यक्तींसाठी विविध भाषांमध्ये व्यावसायिक दर्जाच्या अनुवाद व प्रुफे तपासण्याचे काम आयसीएस करून देते.

विविध उद्योगक्षेत्रातील वेगवेगळ्या विभागांतील दस्तावेज व वेबसाईट्सच्या अनुवादाचे काम आम्ही करतो व तुमच्या इष्ट वाचकांना अनुसरून वेगवेगळ्या लेखनशैलींमध्ये मजकूर तयार करून देऊ शकतो.

प्रत्येक देशाला अनुसरून विशिष्ट मजकूर तयार करून देणे, तसेच विशिष्ट भूप्रदेश डोळ्यासमोर ठेऊन आखण्यात आलेल्या विपणन धोरणांची अंमलबजावणी करणे ही कामेदेखील आम्ही करू शकतो.

ग्राहकांना आमच्याकडून करून हवे असलेले काम अतिशय तातडीचे असू शकते व त्यामुळे ते अतिशय कमी वेळात पूर्ण करून देणे आवश्यक आहे ही बाब आमच्या व्यावसायिकांच्या टीमला माहिती आहे व त्यांचे काम ते त्यानुसार करत असतात. म्हणूनच आमची कंपनी लवचिक, सक्षम, ग्राहकांच्या विशिष्ट गरजांना अनुसरून सेवा अतिशय स्पर्धात्मक दरात प्रदान करू शकते.