संलग्न विपणन

तुमच्या व्यवसायाला नवीन ग्राहक मिळवून देण्यासाठी संलग्न विपणन हा यावर केल्या जाणाऱ्या खर्चाचे पुरेपूर मूल्य देणारा मार्ग ठरू शकतो.

आमच्याकडे आमच्या कंपनीची स्वतःची कुशल व अनुभवी संलग्न विपणन तज्ञांची टीम आहे, जे तुम्हाला तुमच्या सध्याच्या संलग्न भागीदारांचे व्यवस्थापन व त्याच्यामध्ये वाढ घडवून आणणे तसेच नवीन संलग्न कार्यक्रम तयार करण्यासाठी मदत करू शकतात.

भागीदार, ग्राहक, सभासद अशा संलग्नांची नेमणूक व त्यांचे व्यवस्थापन हे आमच्या तज्ञांच्या टीमचे मुख्य काम असून मोठ्या प्रमाणावरील संभाव्य भागीदार वेबसाईट्सपर्यंत पोहोचण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे, त्यामुळे ते तुम्हाला तुमच्या संलग्न भागीदारांचा समूह निर्माण करण्यात व त्यांची संख्या वाढवण्यात मदत करतात.

आयसीएसमध्ये आम्ही आमच्या सेवा तुमच्या आवश्यकता समजून घेऊन त्यानुसार तयार करतो व तुमच्या गरजेनुसार संलग्न भागीदार निर्माण करण्यासाठी किंवा त्यांची संख्या वाढवण्याचे अभियान पूर्ण किंवा वेगवेगळे भाग करून सांभाळू शकतो. हे काम आम्ही वेगवेगळ्या भाषांमध्ये व वेगवेगळ्या देशांमध्ये, प्रदेशांमध्ये करू शकतो.

गेमिंग, विमा, अर्थसहाय्य, टेलिकॉम, पर्यटन, क्रीडा व रिटेल अशा विविध क्षेत्रात आम्ही तज्ञ आहोत. लघुकालीन, तात्पुरत्या किंवा दीर्घकालीन प्रकल्पांवर आम्ही काम करू शकतो, प्रत्येक प्रकल्पामधून काय निष्पन्न होणार आहे हे आम्ही स्पष्ट केलेले असते व हे सर्व काम अतिशय कमी खर्चात व खर्च केलेल्या रकमेचे पूर्ण समाधान मिळेल अशाप्रकारे केले जाते.

घनिष्ठ संबंध, संलग्न उद्योगक्षेत्राचे ज्ञान व पुढे वाढवता येतील अशा पायाभूत सुविधा यांच्या बळावर आम्ही आमच्या अनेक विश्वसनीय ग्राहकांसाठी आम्ही अनेक दीर्घकालीन प्रकल्पांचे काम यशस्वीपणे पार पाडले आहे. आमच्या संलग्न विपणन सेवा प्रत्येक ग्राहकाच्या विशिष्ट गरजांना अनुसरून तयार केल्या व पुरवल्या जातात.